23 उपजिल्हाधिकारी, 25 तहसीलदारांच्या बदल्या!

Foto
उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले, तहसीलदार कृष्णा कानगुले यांची बदली
  कोरोना महामारीमुळे लांबलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचा पोळा आता अखेर फुटला. राज्य शासनाने काल एकाच दिवशी मराठवाड्यातील 23 उपविभागीय तसेच उपजिल्हाधिकारी तर 25 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले यांची विशेष भूसंपादन अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागेवर मंदार वैद्य हे पदभार स्वीकारणार आहेत. भोकरदनचे उपविभागीय अधिकारी शिव कुमार स्वामी यांची उस्मानाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. 
जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांची परभणी निवडणूक उपजिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी केशव नेटके आता जालन्यात आरडीसी म्हणून असतील. जालना उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयळे या नांदेडच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून आता काम पाहतील. यांच्यासह जवळपास 23 उपविभागीय अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले आहेत. औरंगाबादचे तहसीलदार कृष्णा कानगुळे यांची हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. कृषक विभागाच्या तहसीलदार शितल राजपूत यांची फुलंब्री तहसीलदार, सिल्लोडचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांची उदगीर तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर विक्रम महाजन राजपूत हे पदभार स्वीकारतील. आष्टीचे तहसीलदार वैभव महिंद्रकर आता जालना येथे सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार राजाभाऊ कदम आता आष्टी तहसील म्हणून कारभार पाहणार आहेत. खुलताबाद चे तहसीलदार राहुल गायकवाड आता वैजापूर तहसीलदार म्हणून काम पाहतील.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker